Luke 11:46 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो म्हणाला, “तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्यांना लावत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “तुम्हा शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार! कारण वाहण्यास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्यांना लावत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही जे नियमशास्त्रतज्ञ आहात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांच्या खांद्यावर अशी अवघड ओझी लादता, जी ते वाहू शकत नाहीत, परंतु त्यांना मदत करण्यासाठी स्वतःचे एकही बोट लावण्याची तुमची इच्छा नसते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांस वाहण्यास कठीण असे ओझे त्यांच्यावर लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही.