Luke 12:46 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्या दिवसाची तो वाट पाहत नाही त्या दिवशी त्या नोकराचा मालक येईल व अशा वेळी येईल की ती वेळ त्याला माहीत असणार नाही. आणि तो त्याचे वाभाडे वाभाडे काढील व तो त्याला अविश्वासू लोकांबरोबर ठेवील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर तो अपेक्षा करत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्या नोकराचा धनी येऊन त्याला कठोर शिक्षा करील आणि त्याची गणती अविश्वासू लोकांमध्ये करण्यात येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील, आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल. तो त्या दासाचे तुकडे करेल व अविश्वासणार्‍यांबरोबर त्याला वाटा देईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तो नोकर वाट पाहत नाही त्यादिवशी आणि त्यास माहीत नाही तेव्हा त्याचा मालक येईल व त्यास कापून त्याचे तुकडे करील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा ठेवील.