Luke 13:33 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टयांने यरुशलेमाबाहेर मरणे ह्याचा विचार करणे चूक आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तरीही मला आज, उद्या व परवा पुढे जात राहिले पाहिजे कारण यरुशलेमबाहेर संदेष्ट्यांचा नाश व्हावा, हे शक्य नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे; कारण यरुशलेमेबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही झाले तरी मला आज, उद्या आणि परवा प्रवास केलाच पाहिजे कारण संदेष्ट्यांची हत्या यरुशलेमच्या बाहेर होणे शक्य नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरूशलेम शहराबाहेर मारला जावा हे शक्य नाही.”