Luke 13:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
किंवा त्या अठरा जणांचे काय? ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हांला वाटते का की, यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहमधील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते, असे तुम्हांला वाटते काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किंवा शिलोआमाचा बुरूज जेव्हा त्या अठरा लोकांवर पडला आणि ते मरण पावले, तर तुम्हाला असे वाटते काय की, यरुशलेममध्ये राहणार्या सर्वांपेक्षा ते अधिक दोषी होते?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठराजण यरूशलेम शहरात राहणाऱ्या इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हास वाटते का?