Luke 14:16 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग येशू त्याला म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्याला म्हटले, “एका मनुष्याने संध्याकाळी जंगी मेजवानी द्यायचे ठरविले. पुष्कळांना आमंत्रण केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्याला म्हटले, “कोणाएका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी उत्तर दिले: “एक मनुष्य मोठी मेजवानी देण्याची तयारी करत होता आणि त्याने अनेक पाहुण्यांना आमंत्रणे दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग येशू त्यास म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांस आमंत्रण दिले.