Luke 14:31 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ʇकिंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अथवा असा कोण राजा आहे की, तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, जो वीस हजारांचे सैन्य घेऊन माझ्यावर चाल करून येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अथवा असा कोण राजा आहे की तो दुसर्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, ‘जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“किंवा असा कोण राजा आहे, जो दुसर्या राजाच्या विरुद्ध युद्धास जाणार आहे. तो बसून विचार करणार नाही का, जो वीस हजार सैनिक घेऊन येत आहे त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी त्याला दहा हजारांना घेऊन जाणे शक्य होईल का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्यास त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय?