Luke 14:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर येशू आजूबाजूच्या लोकांना म्हणाला, “तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला, तर तो त्याला साबाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने त्यांना म्हटले, “तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर ते म्हणाले, “जर तुमचे लहान लेकरू किंवा बैल शब्बाथ दिवशी विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्यास ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?”