Luke 16:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग त्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, “तू माइया मालकाचे किती देणे लागतोस?’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने आपल्या धन्याच्या कर्जदारांना बोलावले आणि पहिल्याला विचारले, ‘माझ्या धन्याकडून तू किती कर्ज घेतले आहे?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकर्यास बोलावले आणि पहिल्याला म्हटले, ‘माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक कर्जदाराला बोलाविले. त्याने पहिल्यास विचारले, ‘माझ्या धन्याचे तुझ्यावर किती कर्ज आहे?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग कारभाऱ्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, तू माझ्या मालकाकडून किती कर्ज घेतले आहे जे तुला फेडायचे आहे.