Luke 16:8 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि मालकाने त्या अप्रामाणिक कारभाऱ्यायाची प्रशंसा केली. कारण तो धूर्तपणे वागला होता. या जगाचे पुत्र त्यांच्यासारख्यांशी वागताना प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा अधिक धूर्ततेने वागतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अप्रामाणिक व्यवस्थापकाने चतुराई दाखवली. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक त्यांच्या पिढीतल्या लोकांबरोबर व्यवहारात प्रकाशाच्या लोकांपेक्षा अधिक चतुर असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अन्यायी कारभार्‍याने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक आपल्या-सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“त्या लबाड कारभार्‍याची ही धूर्तता पाहून धन्याने त्याची वाहवा केली. या जगाचे लोक त्यांच्यासारख्यांशी व्यवहार करताना फार धूर्ततेने वागतात. प्रकाशाच्या लोकांना मात्र तसे वागता येत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरुन धन्याने त्याची वाहवा केली; कारण या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.