Luke 16:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी तुम्हांस सांगतो, तुमच्यासाठी तुमच्या ऐहिक संपत्तीने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा ते संपेल तेव्हा ते तुमचे अनंतकाळच्या घरात स्वागत करतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धन नाहीसे होईल तेव्हा शाश्वत निवासस्थानी तुमचे स्वागत व्हावे म्हणून तुम्ही आपणासाठी अनीतिकारक धनाने मित्र जोडा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा; ह्यासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांला सार्वकालिक वस्तीत घ्यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जगातील संपत्ती आपल्याला मित्र मिळविण्यासाठी वापरा म्हणजे ज्यावेळेस ती नाहीशी होईल तेव्हा तुम्हाला सार्वकालिक घरामध्ये निश्चितपणे प्रवेश मिळेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुम्हास सांगतो, तुमच्यासाठी, तुमच्या अनीतीच्या धनाने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा हे धन संपेल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे