Luke 17:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की, आपण बरे झालो आहोत, तेव्हा तो परत आला व त्याने मोठ्या स्वरात देवाची स्तुति केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांतील एक जण आपण बरे झालो आहोत, असे पाहून उच्च स्वराने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्यापैकी एकाने आपण शुद्ध झालो आहोत असे पाहिले, तेव्हा तो उच्चस्वराने परमेश्वराची स्तुती करीत परत आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला.