Luke 17:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण शिष्यांना तो म्हणाला, “असे दिवस येतील की जेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या गौरवाने येण्याच्या एका दिवसाची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहाल. परंतु तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुढे त्याने शिष्यांना म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा बाळगाल, पण तो दिवस तुम्हांला दिसणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यावर त्याने शिष्यांना म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल पण तो तुम्हांला दिसणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते शिष्यांना म्हणाले, “अशी वेळ येत आहे की, मानवपुत्राच्या राज्याचा एक दिवस पाहावा अशी तुम्हाला उत्कंठा लागेल, परंतु तुम्हाला ते दिसणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिष्यांना तो म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसापैकी एका दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहाल. पण तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही, असे दिवस येतील.