Luke 17:31 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“त्या दिवशी जर एखादा छपरावर असेल व त्याचे सामान घरात असेल, त्याने ते घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या दिवशी जो छपरावर असेल, त्याने आपले सामान नेण्याकरिता खाली घरात जाऊ नये. तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी घराकडे परत जायला निघू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरता खाली येऊ नये आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी ‘मागे फिरू नये.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवशी जो कोणी घराच्या छपरावर असेल, त्याने सामान घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे शेतात काम करणार्याने कशासाठीही परत जाऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यादिवशी जर एखादा छतावर असेल व त्याचे सामान घरात असेल, तर त्याने ते बाहेर काढण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.