Luke 19:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोक या गोष्टी ऐकत असतानाच येशूने त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली, कारण तो यरुशलेमाजवळ होता म्हणून त्यांनी असा विचार केला की, देवाचे राज्य तत्काळ प्रगट होणार आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लोक ह्या गोष्टी ऐकत असता येशूने त्यांना एक दाखला सांगितला. कारण तो यरुशलेमजवळ पोहोचला होता आणि देवाचे राज्य आता लवकरच प्रकट होणार आहे, असे त्यांना वाटत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला; कारण तो यरुशलेमेजवळ होता, आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते ऐकत असतानाच, येशूंनी त्यांना पुढे एक दाखला सांगितला, कारण ते यरुशलेमजवळ होते आणि लोकांना असे वाटले की परमेश्वराचे राज्य आता लवकरच प्रकट होणार आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला कारण तो यरूशलेम शहराजवळ होता आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते.