Luke 2:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या दिवसात कैसर औगुस्तकडून हुकुम झाला की, रोमन जगातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सर्व रोमन साम्राज्याची जनगणना व्हावी, असे सम्राट औगुस्त ह्याने फर्मान सोडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवसांत असे झाले की, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्याची आज्ञा झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवसात कैसर आगुस्तची आज्ञा झाली की, सर्व जगाची नावनोंदणी लिहिली जावी.