Luke 2:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा देवदूत त्यांना सोडून परत स्वर्गात गेले, तेव्हां मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, ‘चला, बेथलेहेमला जाऊ या आणि घडलेली जी गोष्ट देवाने आम्हांला कळविली ती पाहू या.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देवदूत स्वर्गात गेल्यानंतर मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेम येथे जाऊ या. प्रभूने आपल्याला जी गोष्ट सांगितली आहे, ती प्रत्यक्ष पाहू या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग असे झाले की, देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
देवदूत त्यांना सोडून स्वर्गात वर गेल्यानंतर, मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले: “चला, आपण बेथलेहेमला जाऊ आणि प्रभूने सांगितलेली ही जी घटना घडली आहे, ती प्रत्यक्ष पाहू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि घडलेली ही जी गोष्ट परमेश्वराने आम्हास कळवली ती बघू या.