Luke 2:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशेच्या नियमाप्रमाणे जो त्यांचा शुद्धीकरणाच्या विधीचा काळ होता तो आला तेव्हा त्याला देवापुढे सादर करण्याचा विधि करण्यासाठी ते त्याला घेऊन यरुशलेमला गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे शुद्धीकरणाचे दिवस जवळ आल्यावर बाळ प्रभूला समर्पित करावे म्हणून योसेफ व मरिया त्याला यरुशलेम येथे घेऊन गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे ‘शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर’ ते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्धीकरणाच्या अर्पणाची वेळ आली, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्याला प्रभूला सादर करण्यासाठी यरुशलेमला नेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्यास वर यरूशलेम शहरास घेऊन आले; ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे.