Luke 2:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, तो येशूची आई मरीया हिला म्हणाला, “इस्राएलात, हे मूल, अनेकांचे पडणे व उठणे यांस कारणीभूत ठरेल. जे चिन्ह नाकारले जाईल ते होण्याकरिता याची नेमणूक झाली आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलमध्ये अनेकांचा नाश व उद्धार व्हावा म्हणून व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह व्हावे म्हणून परमेश्वराने ह्याची नियुक्ती केली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळाची आई मरीयाला म्हणाला: “इस्राएलमध्ये अनेकांचे पतन व पुन्हा उठणे आणि ज्या विरुद्ध लोक बोलतील, हा असे चिन्ह होईल, यासाठी या बालकाला नेमून ठेवले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, पाहा, इस्राएलातील अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे यासाठी आणि ज्याविरूद्ध बोलतील अशा चिन्हासाठी ठेवलेला आहे.