Luke 2:48 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले. त्याच्यी आई त्याला म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का केले? तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याला तेथे पाहून त्याच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझे वडील व मी चिंताक्रांत होऊन तुझा शोध घेत परत आलो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला तेथे पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना पाहून त्यांचे आईवडील विस्मित झाले. आईने विचारले, “मुला, तू आमच्याशी असा का वागलास? तुझे वडील आणि मी चिंतित होऊन तुला शोधत आहोत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा त्यांनी त्यास पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्याची आई त्यास म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का वागलास? ऐक, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.”