Luke 20:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक यांनी त्याचवेळी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीति वाटत होती. त्यांना त्याला अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शास्त्री व मुख्य याजक हे त्याच घटकेस त्याच्यावर हात टाकायच्या विचारात होते, कारण हा दाखला त्याने त्यांना उद्देशून सांगितला, हे ते समजले. पण त्यांना लोकांची भीती वाटली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शास्त्री व मुख्य याजक हे त्याच घटकेस त्याच्यावर हात टाकण्याच्या विचारात होते; पण त्यांना लोकांची भीती वाटली; हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे ते समजले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रमुख याजक आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी हा दाखला ऐकला, तेव्हा येशूंना ताबडतोब अटक करण्याचा मार्ग ते शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले पण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक लोक यांनी त्याचवेळी त्यास अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यांना त्यास अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता.