Luke 20:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ʇगुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मेला, व त्या भावला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्याला मुले व्हावीत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, एखाद्याचा भाऊ त्याची पत्नी जिवंत असता निःसंतान निधन पावला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘एखाद्याचा भाऊ’ आपली बायको जिवंत असता ‘निःसंतान असा मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“गुरुजी, मोशेने आम्हासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मरण पावला व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्यास मुले व्हावीत.