Luke 20:47 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या माणसांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते विधवांची घरे गिळंकृत करतात. लोकांना दाखवण्याच्या उद्देशाने लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना अधिक शिक्षा होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते विधवांची घरे गिळंकृत करतात आणि ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात; त्यांना अधिक शिक्षा होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या मनुष्यांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.”