Luke 22:35 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हांला थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांस काही कमी पडले का?” ते म्हणाले, “काहीही नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी तुम्हांला थैली, झोळी व वहाणा घेतल्याशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठवले तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर येशूंनी त्यांना विचारले, “मी तुम्हाला झोळी, पिशवी किंवा पायतणे न घेता पाठविले, तेव्हा तुम्हाला काही कमी पडले का?” “नाही,” त्यांनी उत्तर दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हास थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठवले, तेव्हा तुम्हास काही कमी पडले का?” ते म्हणाले, “काहीही नाही.”