Luke 22:37 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण मी तुम्हांस सांगतो, हा शास्त्रभाग माझ्यामध्ये परिपूर्ण झालाच पाहिजे: “आणि तो अपराधी असा गणला गेला.’ यशया 53:12 होय, हा माझ्याविषयीचा संदर्भ पूर्ण होत आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी तुम्हांला सांगतो, तो गुन्हेगारांत गणलेला होता, असा जो धर्मशास्त्रलेख आहे, तो माझ्या बाबतीत पूर्ण झाला पाहिजे, कारण माझ्याविषयी लिहिलेल्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुम्हांला सांगतो ‘तो अपराध्यांत गणलेला होता’ असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्या ठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण माझ्याविषयीचे भविष्य पूर्ण होण्याचा समय आला आहे. ते भविष्य हे: ‘अधर्मी लोकांत त्याची गणना झाली.’ संदेष्ट्यांनी माझ्याविषयी जे काही लिहून ठेवले आहे; ते सर्व पूर्णतेस जाईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुम्हास सांगतो, तो अपराध्यांत गणलेला होता, असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्याठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्या विषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”