Luke 23:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो त्यांना म्हणला, “तुम्ही या माणसाला तो लोकांना भडकावीत होता म्हणून आणले, आता मी त्याची तुमच्यासमोर चौकशी केली आहे आणि तुम्ही त्याच्याविरुद्ध जे आरोप करीत आहात त्यासाठी मला काहीही आधार सापडत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले. जो आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता, त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या माणसात काहीही दोष सापडत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पाहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्ही या मनुष्याला, तो लोकांना बंड करावयास चिथावीतो म्हणून माझ्याकडे आणले. मी त्याची तुमच्यासमोर कसून तपासणी केली आणि तो निर्दोष आहे, असे मला आढळून आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“हा मनुष्य लोकांस फितवणारा म्हणून याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष चौकशी केल्यावर मला या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही.