Luke 24:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वत:शीच आश्चर्य करीत दूर गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र पेत्र उठून कबरीकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाच्या कापडाचे तुकडे दिसले. झालेल्या प्रकाराविषयी आश्चर्यचकित होऊन तो घरी गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
[तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले तेव्हा त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली; आणि झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करत तो घरी गेला.]
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्र कबरेजवळ धावत गेला व त्याने आत डोकावून पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाच्या पट्ट्या पडलेल्या दिसल्या, तेव्हा काय घडले असावे याविषयी तो आश्चर्य करीत परत गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्यास तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.