Luke 3:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हन्नास व कयफा हे उच्च याजक असताना जखऱ्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि हन्ना व कयफा हे प्रमुख याजक होते; तेव्हा जखर्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हन्ना व कयफा हे महायाजक पदावर होते. यावेळी जखर्याहचा पुत्र योहानास अरण्यात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि हन्ना व कयफा हे मुख्य याजक लोक होते, तेव्हा अरण्यात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.