Luke 3:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक दरी भरुन येईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल वाकड्यातिकड्या जागा सरळ केल्या जातील ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रत्येक दरी भरली जाईल. प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल. वळणावळणाचे रस्ते सरळ केले जातील. खडबडीत वाटा समतल केल्या जातील
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक दरी भरून जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी समान होतील, वाकड्या वाटा सरळ होतील, खडतर रस्ते सुरळीत होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक दरी भरली जाईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल, वांकडी सरळ होतील, आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील