Luke 4:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जो उतारा काढला त्यात असे लिहिले होते:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला; त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यशायाह संदेष्ट्याचे भविष्य असलेल्या अभिलेखाची गुंडाळी त्यांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ती उघडली, ज्यात असे लिहिलेले होते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्यास देण्यात आला. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्याठिकाणी असे लिहिले आहे,