Luke 4:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला. सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तीची नजर त्यांच्यावर एकवटली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने ग्रंथपट बंद करून सभास्थानाच्या सेवकाला परत करून तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येकजण त्याच्याकडे रोखून पाहत होता.