Luke 4:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक उठले आणि त्यांनी त्याला (येशूला) शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या टेकडीच्या कड्याकडे त्याला ढकलून देण्यासाठी घेऊन गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्यांचे गाव वसले होते, त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले, आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते उठले, त्याला नगराबाहेर घालविले व ज्या टेकडीवर ते शहर वसले होते, त्या टेकडीच्या कड्यावरून ढकलून देण्यासाठी घेऊन आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते लोक उठले आणि त्यांनी येशूला शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या कड्यावरून त्यास लोटून देण्यास तेथवर नेले.