Luke 4:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे: देवाचा पवित्र तोच तू आहेस.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“आम्ही आमचे पाहून घेऊ! अरे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अरे येशू नासरेथकरा! ‘तू आमच्यामध्ये का पडतोस?’ तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र (पुरुष) तो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नासरेथकर येशू येथून निघून जा! तुम्हाला आमच्याशी काय काम? आमचा नाश करावयास आले आहात काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे! देवाचा पवित्र! तो तूच आहेस.