Luke 4:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करु लागली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तिच्या खाटेजवळ उभे राहून त्याने तापाला आदेश दिला व तिचा ताप निघाला. ती लगेच उठून त्यांची सेवा करू लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी तिच्यावर वाकून तापाला धमकाविले व तिचा ताप नाहीसा झाला. ती लगेच उठली आणि त्यांची सेवा करू लागली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले आणि तिच्यातून ताप निघाला. ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली.