Luke 4:42 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा दिवस उगवला तेव्हा तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्याला शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले. आणि त्याने त्यांच्यातून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दिवस उगवल्यानंतर तेथून निघून तो एकांत ठिकाणी गेला. लोकसमुदाय त्याचा शोध घेत त्याच्याजवळ आले आणि आपणामधून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला आग्रह करू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आले, आणि आपल्यापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहाटेच, येशू एकांतस्थळी गेले. लोक त्यांना शोधीत जिथे ते होते तिथे गेले. तेव्हा येशू त्यांना सोडून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिवस उगवताच, तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्यास शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले आणि त्यांच्यातून त्याने निघून जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले.