Luke 5:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग असे झाले की, लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती व ते देवाचे वचन ऐकत होते आणि तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एकदा येशू गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा असताना लोकसमुदाय देवाचे वचन ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गर्दी करीत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्याशी उभा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले,