Luke 5:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग येशूने त्याला आज्ञा केली की, “कोणालाही सांगू नकोस, पण जा आणि स्वत:ला याजकाला दाखव आणि तुझ्या शुद्धतेबद्दल मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे अर्पण कर. त्यांना समजेल की तू बरा झाला आहेस. ते आश्चर्यचकित झाले, त्यांच्यासाठी हा पुरावा म्हणून कर.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेने नेमून दिल्याप्रमाणे बलिदान अर्पण कर.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वत:स ‘याजकाला दाखव,’ आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर येशूंनी त्याला निक्षून सांगितले, “हे कोणाला सांगू नकोस, पण जा, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस, याचे प्रमाण प्रत्येकाला पटेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग येशूने त्यास निक्षून सांगितले की, “कोणालाही सांगू नकोस, पण जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांच्यासाठी ही साक्ष व्हावी म्हणून मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”