Luke 6:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते तेथे त्याचे ऐकण्यास व त्यांच्या रोगापासून बरे होण्यास आले होते. व ज्यांना अशुद्ध आत्म्यांनी बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधींपासून मुक्त करण्यात आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे लोक त्याचा संदेश ऐकायला व रोग बरे करून घ्यायला आले होते. अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना त्याने बरे केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यांना त्याने बरे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते येशूंचे ऐकण्यासाठी व रोगमुक्त होण्यासाठी आले होते. जे अशुद्ध आत्म्याने पीडलेले होते, त्यांनाही त्यांनी बरे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तेथे त्याचे ऐकण्यास व आपल्या रोगांपासून बरे होण्यास आले व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधीपासून मुक्त करण्यात आले.