Luke 6:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केले, तर तुम्ही काय विशेष केले? पापी लोकसुद्धा, जे त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर प्रेम करतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे तुमच्यावर प्रीती करतात, त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुम्हांला श्रेय ते कोणते? कारण पापी लोकही त्यांच्यावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपल्यावर प्रीती करणार्यांवर प्रीती करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा काय लाभ? कारण पापी लोकही त्यांच्यावर प्रेम करणार्यांवर प्रेम करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा, तर त्यामध्ये तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात.