Luke 6:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्यांच्याकडून तुम्हांला परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्यांच्याकडून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले, तर त्यात तुम्हांला श्रेय ते कोणते? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही उसने देतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुमचे पैसे परत करू शकतील अशी तुमची आशा आहे, त्यांनाच तुम्ही उसने देता, तर त्यात तुम्ही चांगले ते काय करता? दुष्टही आपल्या सर्व रकमेची फेड करणार्‍या दुष्टाला उसने देतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्यांच्याकडून तुम्हास परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.