Luke 7:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो गावाच्या वेशीजवळ आला असता, एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरीता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. आणि ती विधवा होती. आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला, तेव्हा तेथून एका मृत माणसाची अंत्ययात्रा जात होती. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती. त्या नगरातले पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते गावाच्या वेशीजवळ आले असता एका मुलाची प्रेतयात्रा बाहेर पडत होती व तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक पुत्र होता. तिच्याबरोबर गावातील मोठा लोकसमूह होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसा तो गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा कोणाएका मरण पावलेल्या मनुष्यास बाहेर घेऊन जात होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती; आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते.