Luke 7:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योहानाचे निरोपे गेल्यावर येशू समुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला: “वाळवंटात तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता? वाऱ्याने वाकलेल बोरु?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योहानने पाठवलेले शिष्य गेल्यावर तो योहानविषयी लोकसमुदायाला सांगू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालवलेला बोरू काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग योहानाचे निरोप्ये गेल्यावर तो योहानाविषयी लोकसमुदायांना म्हणू लागला, “तुम्ही काय पाहण्यास रानात गेला होता? वार्याने हलवलेला बोरू काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योहानाचे शिष्य गेल्यानंतर, येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्याच्या झोताने हलणार्या लव्हाळ्याला काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग योहानाचे निरोपे गेल्यावर तो योहानाविषयी समुदायांशी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला बाहेर रानात गेला? वाऱ्याने हलवलेला बोरू काय?