Luke 7:29 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी मान्य केले की, देवाची शिकवण चांगली आहे. जकातदारसुद्धा सहमत झाले. या लोकांना योहानाने अगोदरच बाप्तिस्मा दिला होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचा संदेश ऐकून परमेश्‍वराचे समर्थन केले कारण त्यांनी योहानचा बाप्तिस्मा घेतला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचे ऐकून देवाच्या नीतिमत्त्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जकातदारांसह सर्व लोकांनी येशूंचे हे शब्द ऐकले. परमेश्वराचे मार्ग न्याय्य आहेत, हे त्यांनी योहानाकडून पूर्वीच बाप्तिस्मा घेऊन मान्य केले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जकातदारांसह सर्व लोकांनी ऐकून ‘देव न्यायी आहे’ असे ठरवले कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता.