Luke 7:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले, व अशी विनंति केली की, त्याने येऊन त्याच्या गुलामाला वाचवावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने येशूविषयी ऐकून यहुदी लोकांच्या काही वडील मंडळींना त्याच्याकडे पाठवले व विनंती केली, “आपण येऊन माझ्या दासाला वाचवा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या शताधिपतीने येशूंविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडिलांना येशूंकडे पाठवून, त्यांना आपण येऊन सेवकाला बरे करावे अशी विनंती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून, तू येऊन माझ्या दासास वाचवावे, अशी त्यास विनंती केली.