Luke 7:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण परुशी व नियमाशास्त्राच्या शिक्षकांनी देवाची त्यांच्याविषयी असलेली योजना नाकारली. त्यांनी योहानाला त्यांचा बाप्तिस्मा करु दिला नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु परुशी व शास्त्री ह्यांनी त्यांच्यासंबंधी असलेली देवाची योजना फोल ठरवली कारण त्यांनी त्याच्याकडून बाप्तिस्मा घेतला नव्हता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु परूशी व शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी, परूशी आणि नियमशास्त्रज्ञांनी त्यांच्याबद्दल असलेला परमेश्वराचा संकल्प धुडकावून लावला होता व योहानाकडून बाप्तिस्मा घेतला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली.