Luke 7:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते उनाड मुलांसारखे आहेत, ते बाजारात बसतात, ते एकमेकाला म्हणतात, “आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला पण तुम्ही नाचला नाही. आम्ही तुमच्यासाठी शोकगीत गाईले पण तुम्ही रडला नाही.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत. ती म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही रडला नाहीत.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत; ती म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही रडला नाहीत.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लहान मुलांसारखी ही पिढी आहे. ते बाजारात बसून इतरांना हाक मारतात: “ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजविली, तरी तुम्ही नाचला नाही; आम्ही शोकगीत गाईले, तरी तुम्ही रडला नाही.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जी मुले बाजारामध्ये बसून एकमेकांना हाक मारतात त्यांच्यासारखी ती आहेत, ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही विलाप केला तरी तुम्ही रडला नाही.