Luke 7:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण मीही ताबेदार असून माझ्या अधिपत्याखाली शिपाई आहेत. मी एखाद्याला “जा’ असे म्हणतो, आणि तो जातो, दुसऱ्याला “ये’ म्हणतो आणि तो येतो. मी माझ्या गुलामाला म्हणतो, “हे कर!’ आणि तो ते करतो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण मीदेखील अधिकारी असून माझ्या हाताखाली सैनिक आहेत. मी एकाला जा म्हटले तर तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले तर तो येतो, माझ्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत; मी एकाला ‘जा’ म्हटले म्हणजे तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले म्हणजे तो ते करतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मी स्वतः अधिकाऱ्याच्या अधीन असलेला मनुष्य असून, माझ्याही अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे,’ कर अथवा, ‘ते,’ कर असे म्हटले तर तो ते करतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला मनुष्य असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत; आणि याला मी म्हणतो, जा, म्हणजे हा जातो व दुसऱ्याला ये म्हणतो, म्हणजे तो येतो आणि माझ्या दासास म्हणतो, हे कर, म्हणजे तो ते करतो.