Luke 8:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यानंतर असे झाले की, येशू सर्व गावांतून आणि खेड्यामधून उपदेश करीत व देवाच्या राज्यासंबंधीची सुवार्ता सांगत जात होता. आणि बारा प्रेषित त्याच्याबरोबर होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू प्रबोधन करीत व देवाच्या राज्याचे शुभवर्तमान जाहीर करीत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. त्याच्याबरोबर बारा प्रेषित
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे लवकरच असे झाले की, तो उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता; तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर येशूंनी एका शहरातून दुसर्या शहरात आणि गावोगावी प्रवास करीत परमेश्वराच्या राज्याच्या शुभवार्तेची घोषणा केली. त्यांचे बारा शिष्य त्यांच्याबरोबर होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर लवकरच असे झाले की, तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गांवोगांवी फिरत होता, तेव्हा ते बारा शिष्य त्याच्याबरोबर होते.