Luke 8:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून तो म्हणाला, “तुम्हांला देवाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण इतरांच्यासाठी ते बोधकथेमध्ये दिले आहे. “यासाठी की, जरी ते पाहत असले, तरी त्यांना दिसू नये आणि ऐकत असले तरी त्यांना समजू नये.’ यशया 6:9
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे. परंतु इतरांबरोबर मी दाखले देऊन बोललो ते अशासाठी की, ते पहात असता त्यांना दिसू नये व ऐकत असता त्यांना समजू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे; परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत; अशासाठी की, ‘त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये व ऐकत असता त्यांना समजू नये.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिलेले आहे, परंतु दुसर्यांना दाखल्याद्वारेच सांगण्यात येईल,” ते यासाठी की, “ ‘ते पाहत असले तरी त्यांना दिसू नये, ते कानांनी ऐकत असले, तरी त्यांना समजू नये.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो म्हणाला, “देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये.