Luke 8:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि जे बी वाटेवर पडले ते जे ऐकतात त्याचे दर्शक आहेत. नंतर सैतान येतो आणि त्यांच्या हृदयातील बी घेऊन जातो, यासाठी की त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांचे तारण होऊ नये.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
वाटेवर पडलेले बी म्हणजे जे ऐकतात परंतु सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो आणि त्यांना विश्वास ठेवण्यापासून व तारणप्राप्ती करून घेण्यापासून वंचित करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाटेवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात; नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांना तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पायवाटेवर पडलेले ते, जे वचन ऐकतात, पण सैतान येतो आणि पेरलेले वचन हृदयातून हिरावून नेतो आणि त्यामुळे त्यांना विश्वास ठेवण्याची व तारणाची संधी मिळत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो.