Luke 8:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून त्यांनी त्याला उठविले, ते त्याला म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण बुडत आहोत!” मग तो उठला. त्याने वारा व लाटा यांना दटाविले. ते थांबले. व सर्वत्र शांतता पसरली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरुवर्य, गुरुवर्य, आम्ही बुडत आहोत” तेव्हा त्याने उठून वारा व उसळलेल्या लाटा ह्यांना शांत होण्याचा हुकूम सोडला. त्यावेळी वारा व उसळलेल्या लाटा शांत होऊन सर्व निवांत झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, गुरूजी, आपण बुडालो!” तेव्हा त्याने उठून वार्‍यास व पाण्याच्या कल्लोळास धमकावले, आणि ते बंद होऊन निवांत झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत.” ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले व वादळ थांबले आणि सर्वकाही शांत झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले.